मनाचे श्लोक २० वा (बहू हिंपुटी होइजे मायपोटी)


बहू हिंपुटी होइजे मायपोटी |

नको रे मना यातना तेचि मोठी |


निरोधे पचे कोंडिले गर्भवासी |


अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ||20||


जय जय रघुवीर समर्थ.

मनुष्याचा जन्म किंवा कुठला ही जन्म आणि मृत्यु आणि मधल आयुष्य हे किती प्रकारच्या दुःखाने भरलय याच थोडस समर्थ आपल्याला मार्गदर्शन करतातय. ते म्हणतात तू जन्माला कसा आला आहेस  हे तुला आढवत का? 

*बहु हिंपुटी होइजे माय पोटी*

आईच्या उदरा मध्ये तू जो होतास असा अस्वस्थ झाल्या सारखा,बांधून टाकल्या सारखा,पराधीन आसल्या सारखा असा होतास.आणि तिथे यातना काय होती तुला? मुळात अधोमूख डोक खाली आणि वरती पायअशा अवस्थे मध्ये तू.आणि त्याच्या ही पुढे जाऊन समजा चुकून माकुंन त्या मातेन काही भलत्या सलत्या पदार्थाच सेवन केलच मग त्या तिखट मिठाचा,त्या सगळ्या जळ जळीत पणाचा,सगळ्या तेलाचा तुझ्या वरती अंनत प्रकारे परिणाम होत होता.पण तुला सांगता येत नाही.अस्वस्थ होण्या पलिकडे त्या यातना सोसण्या पलिकडे तुझ्या हातात काहीच नव्हत रे.आणि त्याच्याही पेक्षा समर्थ या ठिकाणी एक शास्रीय सिध्दांत खुप सहज पणे सांगून जातात.गर्भाला पुर्ण होण्या साठी एक विशिष्ट उष्णतेतुन जाव लागत.तेव्हडि उष्णता त्याला सहन कराविच लागते. 

*निरोधे पचे* समर्थानी असा एक शब्द वापरला आहे.त्या एका उष्ण अवस्थे मध्ये तुला रहाव लागल.आ रे खाली डोक घालन या प्रकाराला आपल्या कडे शरणांगति किंवा असाह्य होण,अगतिक होण अशा तऱ्हेचा रंग दिलेला आसतो. तेव्हा असा अधोमूख होऊन तू त्या ठिकानातून जन्माला आलास.बर त्याच्या पुढे यातना चुकल्यायत? छे छे छे.अनेक आपले अज्ञानी आपले माता पीता त्या लेकराला त्याची कातडि इतकि नाजुक असताना सुध्दा आपल्या हौसे साठी जरिचे कपडे काय घालतात मग ती जर काय त्याला टोचते त्या नंतर ते काय बिचार रडत रहात.ते रडायला लागल की हे आपले मिठ मोहऱ्या ओवाळताय.  आनेक दुःख त्या क्षणाला होत रहात. सांगता येत नाही.पाळण्या मध्ये ठेवल तरी सुध्दा पाळण्यातलि एखादि वस्तु टोचत असते.एखादि मूंगी चावत असते.रडण्या पलिकडे आपण काही करु शकत नाही.काही वेळेला माणस आस म्हणतिल आहो जाउद्या हो एक विशिष्ट वय पुढ गेल्यानंतर तिथल काही आठवत सुध्दा नाही.त्या मुळ हे सगळ दुःख आहे हे उगाळण्यात काय गंमत आहे? त्याला उत्तर एकच देता येईल.

की जेव्हा डाँक्टर एखादि शत्रक्रिया करतात.मराठीत त्याला आँपरेशन वगैरे म्हणतात.ते आँपरेशन करण्या पुर्वी ते भुल देतात त्या वेळेला मनुष्य काही शुध्दी वर नसतो.बेशुध्द असताना त्याच्या शरीरावर शस्त्रक्रिया करुन त्याला बर करण्याचा प्रयत्न ते डाँक्टर लोक प्रयत्न करत आसतात.अगदि माण्य.पण आता ते जेव्हा आँपरेशन करत आसतात तेव्हाच दुःख आता मी परत शुध्दिवर आल्यावर ते मला जाणवत नाही मला लक्षात येत नाही.मला माहीत पण नाही तेव्हा मला दुःख होत होत ते.ते किती ही सत्य असल म्हणुन कुणी शस्त्रक्रिया आपण होऊन ओढवून घेत काय? दहा एक माझी आँपरेशन करा.का? नाही तरी मला कळतच नाहीये.अरे वेडया.अशा तऱ्हेन ही दुःख का कुणी ओढवून घेतात ? हा.मात्र एक गोष्ट सत्य आहे.की संत कार्या साठी राम कार्या साठी.देव कार्या साठी असा जर जन्म घ्यावा लागला त्याच्या साठी जर जन्म घ्यावा लागला तर सगळ्या यातना सोसायला लागल्या तर किमान सनमान्य तरी आहे. परमेश्वराच्या या सगळ्या विश्वा मध्ये ईश्वरी कार्या साठी आणि ईश्वरी साधने साठी जर या यातना घेऊन संत महात्मे जन्माला आलेले आसतील कुणी विरात्मे जन्माला आले आसतील तर त्यांच या जगा मध्ये स्वागतच आहे.किंमबहुना अशा कार्या साठी जन्माला येण्याची अनेक संताना सुध्दा ईच्छा आहे.तुकोबा सुध्दा म्हणतातना आपल्या अभंगा मध्ये.

"तुका म्हणे गर्भवासी सूखे घालवे आम्हासि"

सुखान आम्हाला परत जन्माला घातल तरी चालेल.कशा साठी? "संत संघ देई सदा" अशा या *साधने साठी आध्यात्मा साठी आल तर या सगळ्या दुःखाला काही अर्थ आहे.किंवा हे दुःख सहन करन्याला सार्थकता आहे* आणि ते जर नसेल 

"आला आला प्राणी जन्मासी आला" 

अशा तऱ्हेन *किडामुंगी सारख आयुष्य माणुस असताना सुध्दा आपल्या वाटयाला येईल आस येऊ नये आशी तीव्र ईच्छा समर्थान च्या मनात आहे.म्हणुन ते थोड दुःखाच एक भयानक रूप आपल्या समोर उभ करतातय.आणि अशा दुःखातून निवृत्त होण्या साठी उपासनेच्या मार्गान जा असा उपदेश करतातय* आणि उपासने साठी दुःख असेल तर मात्र तर ते थोडस सन्नमान्य आहे.हे ही विवेकानि आपल्या पर्यन्त  सांगतातय.पण *असाह्य पणे अगतिक पणे पर्यायच नाही म्हणुन स्वःहा च्या स्वार्था साठी हे सगळ दुःख सहन करत बसन आणि या दुःखालाच सुख मानत बसन हयाच्या सारखा भाबड़ेपणा नाही. आस आपल्याला समर्थ या श्लोका मध्ये नीट पणे समजावून सांगतात*


|| जय जयरघुवीर समर्थ ।।

थोडे नवीन जरा जुने