मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
मना सत्य ते सत्य वाचे वदावे |
मना मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे ||19||
जय जय रघुवीर समर्थ.
या श्लोका मध्ये समर्थांनी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्याते.की आपल्याला परमार्थाची साधना करायची असेल तर अधिक अधिक सत्याची कास धरली पाहीजे.पुष्कळशा वेळेला आपण अनावश्यक असलेली दुसऱ्याची स्तुति करत रहातो.आणि मग ति बऱ्याचशा वेळेला सत्याची कास सोडावि लागते.तस होऊ नये.आणि समोरच आणखिन महत्वाच सांगतातय.की
*मिथ्य मांडू नकोरे* मिथ्य या शब्दाचा तांत्रिक आर्थ,शास्रीय आर्थ,थोडा वेगळा आहे.तो पाहुया आपण नंतर.पण अगदि समजा मिथ्य म्हणजे असत्य किंवा खोट आस जरी धरल तरी *आपली बुध्दिमत्ता ही समाजा मध्ये काही तरी खोट मंडण्या साठी वापरु नकोस* अन मग ते सिध्द करत बसण्या साठी आपला वेळ वाया जातो.त्यान आपली परमार्था मध्ये हानि होते.हे आपल्या लक्षात येत नाही.आता
कुणी एका मोठया मानसानि पुर्वी असा सिध्दांत मांडला."की आर्यलोक बाहेरुन भारता मध्ये आले" मग नंतर च्या काल खंडा मध्ये परत संशोधन झाल.अगदि DNA टेस्ट पासुन सगळ्या गोष्टी झाल्या.सगळ्या गोष्टी झाल्या.आणि मग लक्षात आल की हा काही बाहेरुन आलेला मनुष्य नव्हे.इथलाच होता तो काही करणा साठी म्हणुन तो बाहेर गेला असेल परंतु तो इथलाच आहे.वगैरे वगैरे हे जरी सगळ झाल.तरी स्वःहा च्या स्वार्था साठी दुर्दैवान हे खोट बोलण्याच व्रत अनेकांनी घेतल.तो पर्यन्त दुर्दैवानि हे खोट इतक माथी मरतात की पाढय पुस्तका मध्ये सुध्दा आपण हेच म्हणतो की आर्य भारता मध्ये बाहेरुन आले. तेव्हा हा एका प्रकारे सत्याला हानि करणारा आणि परमार्थाची ही हानि करणारा आहे.तेव्हा *समाजा मध्ये किमान साधकाने आपल्या बुध्दीचा उपयोग मिथ्य मांडण्या साठी तो करु नये* मिथ्य मंडण्याचे अनेक प्रकार दुर्दैवाने समाजा मध्ये चालु आहे.
आज प्रत्येक जन स्वःहा च्या प्रतिभेन रामयणातली पात्रे घ्यायची महाभारतातली पात्रे घ्यायची आणि मग त्याच्या मध्ये आपल्या मनाला येईल तो प्रसंग घुसडून टाकायचे अन मग मोठ मोठया शब्दान मध्ये प्रसंग सजवायचे आणि मग ते विविध माध्यमातून पसरवुन टाकायचे आणि जणु कही हाच इतिहास आहे.अशा तऱ्हेन ते लोकांन समोर मिथ्या मांडत बसायच.मग लोक ही आरे वा वा वा आहो ही कथा मी वाचलीच नव्हती.ही कथा मला माहितच नव्हती.मग "आज म्या ब्रम्ह पाहिल्या" सारख त्या मुर्खांन च्या कथा वचत बसतात आणि ऐकत बसतात.पण *दुर्दैव आहे.हे मिथ्य मांडल्यानी आपण काही तरी खुप मोठ साहित्यिक कार्य करतो आहे. असा भयानक विचित्र समज अनेक बुध्दिवंतानचा होऊन बसला आहे* तेव्हा किमान साधकाने जो परमार्थाची साधना करतो त्याच्या साठी आवश्यक असलेल्या धर्म ग्रन्थाच वाचन करतोय धर्म ग्रन्थानच काही निरूपण करतो अशा मानसानि तरी किमान आसल्या कुठल्याही मिथ्याला मांडण्याचा प्रकार या ठियानि करु नये.पुढच्या चरणा मध्ये समर्थ उपाय सांगतात.
*मना सत्य ते सत्य वाचे वदावे*
काय आहे.की *व्यवहारा मध्ये सत्य हे क्वचितच फार गोड असत* इतर वेळेला पुष्कळस ते त्रासदायकच असत.पण *प्रत्येक वेळेला सत्य सांगन हे त्रासदायकच असायला पाहीजे आस काही नाहीये* कुणी बुध्दी जर आपण नीट वापरली तर
आपन काही गोष्टी व्यवस्थित सत्य सांगु शकतो.एक प्रसिद्ध आपल्या कडे विद्वानाची कथा भारतभर प्रसिध्द आहे.की
तो महामंत्री आसतो त्या राजाच्या राज्या मध्ये.आणि तो राजा असा सहा आठ महिन्यानि वर्षानि तो त्याच्या मंत्री मंडळात बदल करायचा.आणि का बदल करायचा? काही नाही .बराच काळ या मंत्र्यान हे खात संभाळलय आता याला जरा दुसर खात देऊ या.तेलारी राम यांच्या लक्षात आल .की हा मनुष्य प्रशासन नीट करु शकतो पण याचा अर्थ अशा तऱ्हेन सारख खात्या मध्ये बदल करत बसन योग्य नाही.कारण मुळात एखाद खात देताना.त्याला त्या विषयाची नीट माहिती आहे की नाही? याची परीक्षा घेतलेली आहे? उगाच याचा फार कंटाळा येईल आस वाटून तो दुसऱ्याला देतोय .आता हे सत्य सांगणार कस? की अशा तऱ्हेन समोरच्या मंत्र्याची त्या त्या क्षेत्रातलि योग्यता नसताना त्याला ति जवाबदारी देऊ नये.आली मोठी पंचाइत.तेव्हा तो तेलारीराम एक आशी युक्ति मारतो.की आपल्या राजवाडयातल्या एक.सुताराला स्वैपाक करायला सांगतो.आणि मग तो सुतार त्याच्या पध्दतीन ते गुण्या करवत वगैरे आणून त्याच्या कलेन जसा लाकुड कापततात तसा तो भोपळा काय कापतो. तो जमेल तस काय शिजवतो.आणि मग ते ऱाजाला वाढल जात.राजा संतापतो हे काय अन्न आहे? तेलारी राम म्हणतो फार मोठय कलाकारानी तयार केलेल अन्न आहे.ज्यानी या आपल्या राजवाडया च्या खिडक्या केल्या.ज्यानी ही उत्कृष्ट दार तयार केलि.ज्यानी या दारावरचि उत्कृष्ट आशी नक्षि तयार केलि असा कुणी जो महान मनुष्य त्यानि स्वैपाक केला.राजा म्हणतो आ रे ये महामंत्र्या.त्याला उत्तम दार करता येत आसतील खिडक्या तयार करता येत आसतील.म्हणुन त्याला स्वैपाकाच काम देतात का? महा मंत्री म्हणतात हेच तर मला तुम्हाला सांगायच होत. आहो.कुणाला कुठल ही काम देताना त्या मंत्र्या ची फक्त मागे एक वर्ष आणि पुढे एक वर्ष बघत बसण्या पेक्षा त्याची त्या मध्ये काही गति आहे का? त्या मध्ये त्याचा काही अभ्यास आहे का?ते पाहिल्या शिवाय तुम्ही आशी काही त्याच्यावर जवाबदारी देता.अन मग राज्या मध्ये खेळ खंडोबा होऊन बसतो.ऱाजाला ही लक्षात येत
आता पहा.त्या महामंत्र्या नी सत्य सांगितल.पण ते अप्रिय होईल आस नाही सांगितल.
*सत्य ते सत्य वाचे वदावे* त्याने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला.
आता मिथ्या या शब्दा खरा अर्थ पाहुया.तसा *"मिथ्य" या शब्दाचा शात्रीय अर्थ खोट आस नाहीये.जेव्हा एखाद्या खऱ्या वर किंवा एखाद्या खोटया गोष्टीवर ते खर आहे असा भास होतो त्याला मिथ्य आस म्हणतात*
जस आंधारा मध्ये दोरी पडलेली असते.तर आपल्याला लांबुन असा भास् होतो बापरे इथ साप आहे की काय.हे दोरिवर मला साप असल्याचा भास झाला तेव्हा त्या भासाला मिथ्य म्हणायच*
*मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे* या मध्ये समर्थानी आपल्याला महत्वाची सुचना केलि आहे.की आता त्या दोरिवर भास भासतोय.ते भासन बाजूला केल तर मला त्याची भिंती बाळगायच कारण नाही. तसच *आपण आयुष्याला हे काही प्रचंड सुखाच आहे.असा जो आपल्या आयुष्यावर जो भास् होतोय तो भास पहिल्यांदा सोडुन दिला पाहीजे.आयुष्य तस म्हणल तर सुखाच नाहीये.ते उपासनेन आणि साधनेन सुखाच करता येत आसत* तेव्हा साधना मार्गाला लागल पाहीजे.आयुष्या मध्ये नक्की कस दुःख असत? किती दुःख असत याच थोडस निरूपण पुढल्या श्लोका मध्ये समर्थांनी केलय.तुर्त *सत्य प्रिय वाटेल आस वदावे आणि हे जे मिथ्य आपल्या सुखाचे भास् आहे.हे मिथ्य आहे हे लक्षात ठेऊ या भासा पासुन दूर रहाव हा उपदेश समर्थ या श्लोका मध्ये आपल्याला करताय*
|| जय जयरघुवीर समर्थ ।।