मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोहि पुढे जात आह ।
पुरेना मनी लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनी मागता जन्म घेते।
जय जय रघुवीर समर्थ.
आपली एक विचित्र सवय आहे.या ठिकाणी समर्थ आपल्या समोर मांडताय.आपल्या सुखसंपत्ति साठी ज्यांनि खुप कष्ट केले.खुप काही आटा पिटा केला.खुप काही मिळवल.पण ते सगळ सोडुन तरी त्या बिचाऱ्याला जाव लागल.तर ही मृत्यु भूमि आहे .त्या बध्दल लोक प्रचंड शोक करतात.पण त्याच्यातून स्वःहा काही शिकत नाही.पुन्हा ति माणस त्याच रस्त्यानि पुढे जायला लागतात.याला काय म्हणायच? कित्येक वेळेला वैकुंठातुन बाहेर येणारी माणस एकमेकांन मध्ये ही चर्चा पण करत आसतात.
त्यांनी जरा तिखट मिठाच कमी खायला पाहिजे होत.आता पोटा मध्ये काय हो आसल काही भयानक तिखट गेल्या नंतर त्रास होणारच हो.काय.गेला बिचारा.पण त्याचा शोक करत असताना बाहेर आलेले तेव्हडेच तिखट तेव्हडेच मसालेदार पदार्थ खायला उभे आसतात.तयार आसतात.त्याच काय करणार?
*मरे एक त्याचा दुजा शोक वाहे*
*अकस्मात् तो ही पुढे जात आहे*
कित्येक वेळेला शोक करत बसन्यातच आम्ही आमच आयुष्य वया घालवतो.
आता लोकमान्य टीळकांच्या आयुष्यात, या सगळ्या मोठया लोकांनच आयुष्य बघता आपण त्यांनचा काही आदर्श घेऊन काही तरी साधना करावी.छे छे आपण आपली सुपारी कात्रत चर्च्या करायची.आता लोकमान्यन सारखी माणस कुठून मिळणार? आता लोकमान्यांनसारखा तो त्याग कुठे पहायला मिळणार? गेले गेले ते लोकमान्य गेले तो काळ सुध्दा गेला.तो काळ गेला.हे रडत बसन्यात काय परक आहे? तुझ ही जीवन असच पुढे जाते आहे ते बिचारे काही तरी करुन तरी गेले हा नुसता शोक करता करता मेला असला कलंक आपल्या मस्तकि येईल.आस नको करुस. *आ रे अनेकांनी अनेक सुख समृध्दीचे लोभ केले त्या लोभा पाई सगळे गेले.मग तुही ही त्याच रस्त्याने जर पुढे गेलात तर तुझ्या ही जीवना मध्ये समाधान नावाची गोष्ट मिळणार नाही क्षोभ प्रक्षोभ वैताग हेच तुझ्या मना मध्ये येणार आहेत* कारण जर आपल्या जीवना मध्ये आपल्याला लोभाला आवरता आल तर? समर्थ फार सुंदर सांगतातय.
*पुरेना मनी लोभ*
आणि या साठी श्रीमद्भगवता मध्ये एक सुंदर कथा आहे.
एक भरत नावाचा राजा सगळा राज्य कारभार पुढच्या लोकांनच्या हाती
सोपऊन खऱ्या अर्थानि संन्यास घ्यायला वानप्रस्थ म्हणुन आरण्यात आला.पण त्या ठिकाणी त्याला हरणाच एक पाडस आस काही मिळाल.की ज्याला सांभाळण्या मध्ये पुन्हा तो मनानी इतका गुंतला इतका गुंतला की एका बाजुच ईश्वराच भजन पुजन अखंड नामस्मरण त्याच्या पाशी असणार अनुसंधान ते सगळ बाजूला राहिल.आणि आता त्या हरणाचा काय करु हा मनाला सातत्यान लोभ चिकटल्या मुळे त्याला पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला आणि नंतर मग परत मनुष्याच्या जन्माला जाव लागल आशी भागवत पुराणा मध्ये व्यास महर्षि आपल्याला कथा सांगतात.एव्हड तरी आपण लक्षात घेतल पाहीजे.
आली कडे हारी कीर्तना मध्ये ही कथा आपल्याला नेहमी ऐकायला मिळते.
एक अतिशय वृध्द गृहस्थ आता मृत्यु पंथाला लगले आहे.आता काही काळातच त्याचा मृत्यु होईल.म्हणुन त्या खाटे वर पडला आहे.आणि आसपास जवळचे कुटुंबिय जमा झालेले आहे.अशा वेळेला त्या म्हाताऱ्याच्या मुखा मधुन दोनच अक्षर कशी बशी ऐकू येतात.ऐक ऐकू येत "देवाsss" आणि दुसर अक्षर
ऐकु येत "केsss" मुलांना वाटल मुखातन वासुदेव केशव भगवंताच नाव घेत हा देह टाकायची वेळ आली आहे. आशी आपल्या आजोबांनचि ईच्छा दिसतेय.त्याची ईच्छा अर्धवट का सोडावि? म्हणुन एका प्रख्यात वैद्याला बोलावल.त्यांना सांगितल यांनच्या जिभेला ओषध तरी चटवा यांची जीभ तरी चांगली करा.वैद्यानि
औषध चाटवल्या बरोबर जीभच काय सगळ्या आंगाला स्पूर्ति आली.आता आशी स्पूर्ति आल्यावर त्या म्हातार्या माणसाने शेजारी बसलेल्या थोरल्या मुलाच्या मांडिवर फट दिशि फटका मारुन सांगितल."आरे वेडया.समोरच्या गोठया मध्ये ते वासरू केरसुनी खातय.मघा पासुन मी तुला सांगतोय.लक्ष कुठय मेंल्या?" झाल हा मृत्यु पंथाल लागलेला केव्हा याला यमराज घेऊन जातील ही आवस्था पण याचा जिव अडकलाय कुठय? त्या केरसुनि मध्ये.ते वासरू केरसुनि खातय याच्या मध्ये जर आपला जिव असा अडकून पडला.योग्य नाही बाळा.
*आवश्यक त्या गोष्टी केल्या पाहीजे हे जरी माण्य असल.तरी भगवत प्राप्तिच्या दृष्टिन मार्गक्रमन करत असताना काही काही गोष्टीला क्रमा क्रमा नी बाजूला केल पाहीजे आणि ईश्वर प्राप्ति हा एकच लोभ मना मध्ये प्रबळ केला पाहीजे. हे लक्षात ठेवण्या साठी* समर्थ आपल्याला या श्लोका मधन उपदेश करतात.
|| जय जयरघुवीर समर्थ ||