मना राघवेविण आशा नको रे |
मना मानवाची नको कीर्ति तूं रे |
जया वर्णिती वेद शास्रे पुराणे |
तया वर्णितां सर्वही श्लाघ्य वाणें ||18||
जय जय रघुवीर समर्थ.
मनुष्याच्या जीवना मध्ये कोणत ही संकट आल तर या संकतातून आपल्याला कोण सोडवेल? याचा शोध घेतच आसतो. आणि त्या प्रमाणे कुण्या श्रीमंताच साहाहय.कुण्या सत्ताधिशाच साहाहय कुण्या शक्तिवंताच साहाहय असा मनुष्य मिळवतो.काही प्रमाणात त्या संकटातून मुक्त ही होतो.पण कुणीही आपल्याला किती ही मद्त करणारा असला तरी समर्थ म्हणतात.की काही स्वार्था मुळे त्याच्या दातृत्वाला मर्यादा आसतात. किंवा आयुष्याच्या मर्यादे मुळे सुध्दा त्याच्या दातृत्वाला मर्यादा पडतात. कारण सर्वता सर्व जन्म,सर्व वर्ष,सर्व क्षण,आस निस्वार्थ पणे तुला मद्त करायला कोण तयार आहे? आयुष्या मध्ये कित्येक वेळा कित्येकानि केलेली मद्त आपल्याला दिसत असते.जाणवते पण त्याच्या मध्ये लक्षात येत.की काहिना काहि एक टक्का का होईना त्याचा थोडा तरी त्याचा स्वार्थ त्याच्या मध्ये दडलेला आहे.किंमबहुना तुम्ही मला या सगळ्या संकतातून सोडवल आस कौतुक दहा ठिकाणी कराव एव्हडा तरी स्वार्थ नाकारु शकत नाही.तर निस्वार्थ पणे सातत्याने आपल्या मागे जन्मो जन्म उभा आसणारा असा कोण उभा आहे बर? तो मात्र माझा प्रभुरामचंद्र आहे.अर्थात या ठिकाणी रामचंद्र म्हणजे त्रेतायुगा मधले रामचंद्र असे लक्षात न घेता तो परब्रम्हा परमात्मा रामचंद्र असाच अर्थ लक्षात घ्यायचा. तेव्हा समर्थ म्हणतात.सर्व संकटातून सोडवण्या साठी आपण यथा शक्ति ईतरांनचा शोध घेतो इथपर्यन्त ठीक आहे.पण राघवा शिवाय आपल्या मनामध्ये कोणाची फारशी आशा येऊ नये.किंवा *कुणी सहाय्य केलच तर ते राघवाच्या कृपे मुळ ते प्राप्त झाल आशी आपल्या भावना मना मध्ये दृढ असली पाहीजे*
एक साधि गंमत आशी आहे.की लोक कथेतलि च कथा.
एका नवऱ्यान् मोठया कौतुकान आपल्या बायको साठी नथ केलि आणि ति नथ नाका मध्ये घालून ति बिचारी सगळ्या गावभर मिरवते आहे.सगळ्यांन कौतुकाने सांगते आहे.नाक वर करुन दाखवते ही नथ केलिये मला.माझ्या वाढदिवसा साठी केलि.आणि तीच ही सगळे कौतुक करतातय.छान बाई तुला नवरा चांगला मिळाला बर .पण तिन हे सगळ साधू पाशी हे सगळ सांगिलया नंतर साधू तिला इतकच सांगतो चांगला नवरा मिळाला माण्य आहे.त्यान नथ केलि हेही माण्य आहे.वाढदिवसाला मिळाली हेही माण्य आहे.तू छान दिसते हेही माण्य आहे. आग,पण नथ दिली त्याच जेव्हड कौतुक करतेस त्या पेक्षा थोड जास्त ज्यानी नथ घालायला नाक दिल त्याच कौतुक का नाही आता पर्यन्त करत ? ते नाक तिथे नसत त्याच्या वर बुल्डोजर फिरवल्या सारख वाळवंटच तिथे असत तर त्या नथेच काय केल असतस? बघा.मनुष्याने कुठून ही संकटा मध्ये सहाय्य करणारी एखादि मदत मिळाली तर ति नाकारवि अशात ली गोष्ट नाही.पण तरी सुध्दा मला दुसर्याला मद्त करताना आशी भावना पाहीजे की मी का करु शकलो? तर परमेश्वराची मला मदत होती.आणि *दुसऱ्याची मदत मला मिळताना ही माझी भावना असावी.भगवंतालाच कुठल्या ना कुठल्या मार्गाने मला मदत करायची होती म्हणुन ति मिळालीय. कुठही माणसांच्या कीर्तिला फार महत्व देऊ नये* आस या ठिकाणी समर्थ सांगतात.
माणसाची किती स्तुति किती करायचीय. माणसाला आपल्या मदति साठी किंवा आपल्या स्वार्था साठी आपण *समोरच्या माणसाचे शंभर दुर्गुण विसरतो.आणि त्यानि या क्षणी मद्त केलि या एका सद्गुणा साठी त्याची आयुष्य भर किर्ती गात बसतो* समर्थ म्हणतात. *आ रे एका गुणा साठी बाकि चे दुर्गुण माणसाचे विसरायला लागलात तर अशा कुठल्याही दुर्गुणाचा लवलेश ही नसलेला तो गुणांन चा आगर असलेला असा तो माझा रामचंद्र प्रभु परमब्रम्ह परमात्मा त्याची स्तुति का नाही करत?* या संकटा मध्ये मला पांडुरंगाने मद्त केलि.या संकटा मध्ये मला प्रभु रामचंद्राने आशी मद्त केलि.भले याच्या माध्यमातून केलि.पण रामचंद्रानि केलि.या तऱ्हेन *परमेश्वराचा आठव,परमेश्वराची स्तुति ही सातत्याने आपल्या मना मध्ये रहावि.आणि माणसांच्या स्तुति पेक्षा भगवंताच्य स्तुति मध्ये आपल्या जीवनाचे क्षण अधिक व्यथित करावे* हे लक्षात येन्या साठी समर्थानी या श्लोकाच या ठिकाणी नियोजन केल आहे.
|| जय जयरघुवीर समर्थ ||