मनी मानव व्यर्थ चिंता वहाते |
अकस्मात होणार होउन जाते |
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे |
मतिमंद ते खेद मानी वियोगे ||17||
जय जय रघुवीर समर्थ.
या ठिकाणी समर्थानी आपल्याला एक सुंदर शब्द दिला तो म्हणजे *व्यर्थ चिंता* योग्य चिंता असेल तर ठीक आहे.पण पुष्कळशा वेळेला *मनुष्य जेव्हा हवी तेव्हा योग्य खबरदारी घेत नाही आणि पुढे मग जी चिंता करत बसतो.त्याला समर्थानी *व्यर्थ चिंता* असा शब्द दिलेला आहे.
म्हणजे जेव्हा एखाद्या कुठल्या शतकऱ्यान आस सांगितल."कस होणार हो आता आमच्या पिकाच ? तर अशा वेळेला कुणीही शहाणा मनुष्य पहिली किडचि शक्यता पहातो तो पिकावर किड वगैरे बसु नये म्हणुन योग्य फवारनि केलि होतीस का? नाही जमली तेव्हा.आ रे बाबा समजा अवर्षण आल पुढच्या काळात पाऊस नाही आला तर थोडी पाण्याची काही व्यवस्था करुन ठेवावि कमी पाण्यात ही शेती चांगळी रहावि या साठी ठिबक सींचना व्यवस्था असते त्याची काही व्यवस्था करुन ठेवलिस का? नाही बुवा त्या वेळेला जमल.बर ते जाउदे पिकाला रोज च्या रोज पाणी घालाव लागत ते तरी करतोस का? करतो अधुन मधुन करतोन.म्हणजे पिक चांगल येन्या साठी ज्या ज्या म्हणुन आवश्यक उपाय योजना करायला पाहीजे त्या त्या त्या वेळेला केल्या नसतील तर आता याच्या नंतर च्या काळा मध्ये आता कस होणार या पिकाच? कस काय आपल्या व्यापाराच होणार? हया चिंतेला *व्यर्थ चिंता* असा शब्द समर्थानी वापरलेला आहे.
*पुष्कळशा वेळेला मनुष्य या व्यर्थ चिंतेतच आसतो*
आता चाळिशि आली.पन्ननाशि आली बुवा आता गुढग्याच कस होणार? आ रे गुढग्याच कस होणार म्हणजे? आ रे मनुष्या,तू जर तुझ्या पंधराव्या वर्षी,तुझ्या विसाव्या वर्षी,तुझ्या पंचविसव्या वर्षी,दोन मजले चढण्या साठी सुध्दा लिफ्ट वापरायला सुरुवात केलि असशील .तू जर तुझ्या पंढराव्या वर्षी,तुझ्या विसाव्या वर्षी,तिसाव्या वर्षी,जेवन जमिनीवर बसून करायच असेल तर तर कशाला मांडी घाला कशाला माती लावून घेऊ?टेबल खुर्ची वरच करु.हा जो वेडेपणा तु केला असशील आता चाळीशि पन्नाशी नंतर तुझे गुढ़गे धरणार.तुझे गुढ़घ्याच कस होणार ही *व्यर्थ चिंता* आहे.माझी प्रकृति माझ आरोग्य चांगल रहाव या साठी योग्य वेळा मध्ये योग्य वया मध्ये योग्य काळात आपण योग्य ति घेतली का काळजी? नाही ना.मग त्या नंतर कशाला *व्यर्थ चिंतेला* काय अर्थ रहातो? आ रे मूर्खा.आशी व्यर्थ चिंता करुन काही उपयोग नसतो.आता
*अकस्मात जे होणार ते होउनि जाते*
आता,या ठिकाणी काही माणस हाही प्रश्न विचारतील.की योग्य चिंता घेतलेलि असताना सुध्दा त्या वेळेला दुष्काळ पडतात किंवा आती पाऊस येतो.आणि अशा वेळेला पिक वाहून जातात किंवा अचानक अपघात होतो जेव्हा प्रकृतिचा ऱ्हास होतो. मग आर्थिक फटका असा बसतो की ति आपली मेडिकल पाँलिसि तयार नसते मग त्याच्यात खर्च होण्या सारखा होतो. अगदि माण्य आहे.सगळी खरदारी घेऊन सुध्दा अचानक संकट येतात.मग अशा वेळेला समर्थ म्हणतात की त्यातली *बहुत आंशि संकट ही आपल्या कर्म योगानिच आलेली आसतात* कारण आता आपण आनेक प्रांतांनच पहातो ना.इतकि उत्तम काळजी घेऊन सुध्दा काही वेळेला ओला दुष्काळ येतो काही वेळेला कोरडा दुष्काळ येतो.आणि मग काही वेळेला चांगली विक्री होते काही वेळेला चांगली विक्री नाही होत.हे आपण गेल्या शंभर वर्षाच दोनशे वर्षाच सुध्दा ईतिहासाच गणित बघितलेल आहे.मग आस असताना आपल्या आपत्तिच्या काळा मध्ये आपण आपल्या साठी काही रक्कम बाजूला राखून ठेवली पाहीजे.आपल्याला जेव्हा चांगल मिळत तेव्हा आपण त्यातली काही गोष्ट बाजूला ठेवली पाहीजे.हे आपण सतकर्म केल का? नाही ना केल.मग *घडे भोगणे* ते सगळ आपल्या कर्म योगाने आपल्या आंगावर पुष्कळस घडत असत.पण "भगवंताचिच ईच्छा नाही हो माझ शेत चांगल व्हाव आशी.भगवंताचीच ईच्छा नाही हो माझी आता प्राँपरटी व्हावी आशी.भगवंतलाच वाटत नाही माझ घर व्हाव आस." आस जे रडतातन आपल्या पासुन सुख लांब का गेल माझ्या पासुन त्या सुखाचा वियोग का झाला? या वियोगाला देवाला कारणिभूत ठरवन किंवा दैवाला कारणिभूत ठरवन अशा माणसाला समर्थ *मतिमंद* म्हणतात.
*मतिमंद ते खेद मानी वियोगे*
या सुखाचा जो वियोग झाला.जे मतिमंद आसतील तेच याला खेद मानतात.योग्य मनुष्य त्या सगळ्या पूर्व संकटाची कल्पना लक्षात घेऊन तशी पूर्व तयारी करत रहातो.तस साधकनि सुध्दा आपल्या जीवना मध्ये पुढची संकट लक्षात घेऊन आपल्या इतिहासाचा लाभ घेऊन आपल्या अनेकांण च्या इतरान च्या अनुभवाचा फायदा घेऊन आपली सगळी व्यवस्थित पूर्व तयारी करायला हवी आणि मग या *आपल्या साधनाच्या मार्गानि अतिशय यशस्वी पणे आपल्या परमेश्वराला प्राप्त करुन घ्यायचय तेव्हा या परमेश्वर प्राप्तिच्या या सगळ्या मार्गात आपला व्यवहार अशुभ अमंगल किंवा अयशस्वि होऊ नये या साठी समर्थांनी सातत्यानि उपदेश केला* सर्व संतानी सुध्दा आपला व्यवहार सुध्दायोग्य रहावा म्हणुन उपदेश केला आहेच अनेकांना या साठी अनेक संत वचन आठवत आसतील निश्चित पणे ते मोलाचे आहेतच या *समर्थांनी आध्यात्मा बरोबर व्यवारिक जीवन सुध्दा उत्तम असल पाहीजे आणि या साठी तशि मानसानि आपली तयारी चालू ठेवली पाहीजे याच मार्गदर्शन या ठिकाणी केल आहे*
|| जय जयरघुवीर समर्थ ||