मना सांग पां रावणा काय जाले |
अकस्मात ते राज्य सर्वे बूडाले |
म्हणोनी कुडी वासणा सांडिं वेगीं |
बळें लागला काळ हा पाठीलागिं ||13||
|| जय जयरघुवीर समर्थ ||
आपण आपल्या वैभवा साठी आपल्या समृद्धि साठी इतके प्रचंड धडपड आसतो.आणि कित्येक वेळेला ते वैभव किंवा समृध्दी ही आपल्या शरीर सुखा साठी अधिक आहे आस मानत रहातो.त्या मुळे पुढच्या जीवना मध्ये अंनत दुःख उभी रहतात.समर्थांनी या ढिकानि एक दृष्टांत दिलाय तो फार महत्वाचा आहे.की
*मना सांग पां रावणा काय झाले*
आरे तू तुझ्या बध्दल एव्हडी खात्री बाळगतोयस की माझ्या कडे सगळी सुख, समृद्धि ,आणि शरीर सौसष्ट असल म्हणजे मला काही होणार नहिये म्हणुन.आ रे वेडया.तुझ्या पेक्षा
प्रचंड मोठी संपत्ति,प्रचंड मोठी सत्ता, प्रचंड मोठ सैन्य ,प्रचंड मोठ साम्राज्य, आणि नुसत हे नव्हे आणि त्याच्याही पेक्षा रावण ही काही सामाण्य व्यक्ति नाही हो.अतिशय विद्वान,अतिशय तपस्वी, भगवान शंकराशि साक्षात संवाद करु शकनारा असा शिव उपासक इतक सगळ असताना सुध्दा काय त्या रावणाच झाल सांगा? एव्हड सगळ वैभव,एव्हड सगळ सैन्य त्याला वाचवु शकल का? आणि का नाही वाचवु शकल? या सगळ्या प्रचंड मोठया त्याच्या चांगल्या भागा मध्ये एकच वाईट होत. *कुडी वासणा* देह सुखा वरती आपली वृत्ति आसण किंवा *देह सुखा साठी प्रचंड प्रयत्न करण्याचा आटा पीटा आसण यानी पुढची ही सगळी संकट जन्माला येत आसतात*
जेव्हा शूर्पखेन माझा अपमान झाला आस रावणाला सांगितल त्याने काही रावण पटकन उठून त्या आपमानाच सुड घ्यायला सिध्द नाही झाला.पण जेव्हा शुर्पनखा म्हणजे रावणाची सख्खि बहिन ति. तिन सांगितल,आ रे मी त्या रामाच्या कुटी पाशी गेले होतेन.तिथे त्रिभुवन सुंदरी सीता नावाची अतिशय सुंदरी होती तिला घेऊन मी तुला तुझ्या साठी आणायला गेले होते.आशी अगदि सफशेल शुध्द थाप शुर्पनखेन मारली. आणि जेव्हा तिथे एक कोणी तरी सुंदरी होती आणि ति मला मिळण्याची शक्यता आहे.हे लक्षात आल.तेव्हा रावण त्याच्या पुढच्या प्रति शोधा करता उभा राहिलेला दिसतो म्हणजे एक साधि गोष्ट होती की ज्या योगे आपल्या बहिनीला काय झालय? की बहिनीचा अपमान झालेला तो प्रसंग काय होता. हे फार काहीही जाणून न घेता त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री मिळण्या सारखी आहे म्हटल्या बरोबर एव्हडा विद्वान,एव्हडा तपस्वी, असलेला एव्हडा सत्ता सामुग्री असलेला, मनुष्य जेव्हा असा वहावत जातो तेव्हा त्याच्या पुढ संकट केव्हड उभ रहात पहा.म्हणुन ही *कुडी वासणा* जी आहे.
*कुडी म्हणजे शरीर.या आपल्या कुडी मध्येच सगळ काही सुख आहे आस माण्याचि जी तुझी वासणा आहे.ति सांडलि पाहीजे* हे लक्षात ठेव बाळा.शरीराच्या सुखा मध्ये जेव्हडा वेळ वाया घलवशीलतेव्हडा काळ तुझ्या कडे जो जलद गतिन येतोय त्याच्या कडे तुझ लक्ष जनार नाही.मग या जीवना मध्ये जे ईश्वर दर्शन करुन सार्थक मिळवायच.ते सार्थक तुला साधता येणार नाही.म्हणुन
*बळे लागला काळ हा पाठीलागि*
तुझ्या मागे काळ केव्हा तुला एकदा गिळील तुझ्या पाठीशी लागला असताना आपला हा सगळा वेळ शरीर सुखाच्या वासणे साठी का बर वाया घालवतो.आ रे रावणा सारखा साम्राज्यी सुध्दा जिथे संपला तिथे तुझ्या सारख्या सामाण्य माणसाची काय कथा? तेव्हा *माणसाला खडबडून जागा करण्या साठी.समर्थानी असे काही महत्वाचे श्लोक या ठिकाणी दिलेत याच चिंतन आपण आपल्या संपत्ति वैभवा च्या चिंतनाच्या वेळेला फार मना पासुन केल पाहीजे*
जय जय रघुवीर समर्थ.