मनाचे श्लोक १५ वा ( मना पाहता सत्य हे मृत्युभूमि )


मना पाहता सत्य हे मृत्युभूमि |

जीता बोलती सर्वही जीवी मी मी |

चिरंजीव हे सर्वही माणिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||15||

जय जय रघुवीर समर्थ.

महाभारता मध्ये यक्ष प्रश्न या नावाच एक प्रकरण आहे.पांडव जेव्हा वणवासा मध्ये होते.तेव्हा सर्व पांडवाना खुप तहान लागली.आणि जवळ कुठ पाणी मिळतय का याचा शोध घेत घेत एके ठिकाणी त्यांना एक सुंदर पाण्याच तळ सापडल.पण त्या तळयाचा मालक एक यक्ष होता.यक्ष म्हणजे एक प्रबळ असलेली आपलीअतंरीक्षातलि एक जमात.तो यक्ष या तळयाचा मालक होता.तेव्हा त्याचे परवानगी शिवाय हे पाणी कुणी पिऊ शकणार नाही.यक्षणी अट आशी घातली होती की मी विचारतो त्या प्रश्नाला नीट उत्तर देईल तरच त्याला या तळयाच पाणी पिता येईल. पहिल्या चार ही पांडवान ते माण्य केल नाही.त्या मुळे ते पाणी प्यायला गेले आणि त्या ठिकाणी बेशुध्द होऊन पडले.धर्मराजा मात्र त्या ठिकाणी आला.आणि तो म्हणाला "हे यक्ष राजा  मी यथा शक्ति तुला उत्तर देण्याचा प्रयत्न करिन.आणि मग यक्षणी त्याला अनेक प्रश्न विचारले.आणि त्याला धर्मराजानि त्याला इतकि अप्रतिम उत्तर दिलेली आहे.खर यक्ष प्रश्न आपल्या साधकान साठी दीपस्तंभा प्रमाणे आहे.अतिशय सूत्र बध्द उत्तर आहे.धर्मराजान त्याच्या आयुष्यात एकदा काय द्यूत खेळल.म्हणुन त्याच्या माथी सतत वामीपणाचा शिक्का मारणारे तुम्ही आम्ही धर्मराजाची बुध्दिमत्ता पहायला विसरलो.की धर्मराज म्हणजे युधिष्टिर हा पांडवान मधला जेष्ठ भ्राता.हा काय बुध्दिमान आहे .आहो *बुध्दिमान एखाद क्षण घसरतात  पण एखादा क्षण म्हणजे त्याच आयुष्य नसत.बाकीच्या आयुष्यातले त्यांचे अत्यंत दिव्य क्षण बघीतले पाहीजे* या अनेक प्रश्नांन मध्ये त्या यक्षणी एक प्रश्न असा विचारला होता."की या जगा मधल सगळ्यात मोठ आश्चर्य कोणत आहे ?" आता आश्चर्य म्हटल्या नंतर आपल्या डोळ्या समोर जगातले अनेक आश्चर्य यायला लगतिल.धर्मराजानि परमार्थ दृष्टय एक फार सुंदर आश्चर्य सांगितल.आणि ते आश्चर्य आस आहे.आहो.माणस कुणी मृत झाल तर त्याला स्मशाना पर्यन्त नेतात त्याचा दहन विधि करतात आणि परत येताना जणु काही परत आपण तिकडे जानारच नाही आहोत या नवीन कल्पनेन आयुष्य जगतात.हे समशान वैराग्य एखादा दिवस सुध्दा काही वेळेला टिकत नाही.हे *माणसाच जे विचित्र मन आहे हे जगतल केव्हड मोठ आश्चर्य आहे* खरच समर्थ ही हेच म्हणतात.आहो आपला मृत्यु टाळण्या साठी किती लोकानी प्रयत्न केले.आपण हिरण्यकश्यपु ची कथा जनताच.की त्यान देवा कडून सगळी वरदान प्राप्त करुन घेतली होति.की मला दिवसा मृत्यु नको रात्रि मृत्यु नको घरात नको बाहेर नको सकाळी नको आनेक आनेक,शस्त्राने नको अस्त्राने नको माणस कडून नको जनवरा कडून नको देवा कडून नको दानवा कडून नको काय काय वर होते? पण या सगळ्याला तथास्तु म्हटल्या नंतर सुध्दा या सगळ्यातुन मार्ग काढून नरसिंव रूपा मध्ये प्रगट होऊन हिरण्यकश्यपुला फाडून त्याचा मृत्यु त्याच्या डोळ्या समोर उभा करावाच लागला.तेव्हा समर्थ या ठिकाणी सांगतातय. *आमर वगैरे होण्याच्या  कल्पना हया उगाच काही तरी या जन्मात करु नकोस* खर म्हणशील तर ही वृति आहे. आता जे जे जिवंत आहे ते म्हणतिल "नाहीबुवा आम्हाला काही ति वेळ येणार नाही आम्हाला काही तिकड जाव लागणार नाही."
*जीता बोलती सर्व ही जिव मी मी*
आपण कित्येक वेळेला कौतुकाने लडाने अनेकांना नाव चिंरंजिव लावतो किती ही चिंरंजिव लावल 
*चिंरंजिव हे सर्व माणिताती*
*अकस्मात ते सर्व सोडुनि जाती*
आपल्याला आनेक अशा कथा माहित आसतील ज्याच्या कडे ज्याच्य घरा मध्ये सगळी सुख समृद्धि हात जोडून समोर उभी होती.आणि समोर मनुष्य जेवायला बसला होता .सगळ पंच पनकक्वान्च ताट त्याच्या समोर होत.जरा हात धुन घेतो म्हणाला आणि हात धुवायला गेला आणि संपला. *समर्थ आपल्याला सांगतातय.इतक सगळ जन्मभर आटा पीटा करुन सगळ मी सगळ मिळवलस.अकस्मात सोडुन तुला ही कळणार नाही केव्हा. इकडण एक दिवस निघून जायच आहेस.तेव्हा जे सोडुन द्यायच आहे त्याच्यावर फार चिंतान करु नकोस.जे यथा शक्ति यथा योग्य आहे याच्यात समाधान करुन जे घेऊन जायच आहे त्या साधने साठी जास्त वेळ दे बाळा* या उपासने साठी जास्त वेळ दे.हे कळवळून सांगताना ते  आपल्या मनात ठसवण्या साठी यामृत्युच थोड भयान रूप आपल्या समोर उभ करत आहे.खरच प्रत्येक मनुष्यान आपण साधना किती करतो?उपासना किती करतो किंवा पैशाच्या माग किंवा या शाररिक सुखाच्या साठी किती धडपडतो? याच प्रमाण कधी तरी प्रामाणिक पणे पहाव आणि *आपल वर्तन  ऐहिक सुखा पेक्षा आध्यात्मिक साधने कडे जास्त वळवाव हीच समर्थाची ईच्छा आहे* 

|| जय जयरघुवीर समर्थ ||


थोडे नवीन जरा जुने