मना मानसीं दुःख आणू नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेके देहबुध्दि सोडुनि द्यावी |
विदेही पणे मुक्ति भोगीत जावि ||
जय जय रघुवीर समर्थ.
आपल्या व्यवहारा मध्ये आपल्या प्रपंच्या मध्ये आपल्या घरा मध्ये आपल्या समाजा मध्ये.आपण वागत असताना. काय काय पथ्य पाळली पाहीजे.याचा फार सुंदर उपदेश या ठिकाणी समर्थांनी दिलाय* मनुष्याला अनेक पथ्य पाळली तरी सुध्दा काही ना काही दुखनी येतातच.पण ही दुखनी पुष्कळशा वेळेला शारीरिक फार थोडी आसतात.आणि मानसिक फार जास्त असतात. आपण खुपशा ठिकाणी हे प्रकरण बघतो.की एखद्या माणसाचे गुढ़गे दुखत आसतील तर ते गुढ़गे दुखण्याच याच्या मध्ये वेदना येन्याच प्रमाण फार कमी असत.आणि त्याच्यात त्याच कन्हान विव्हळन ओरडन हे इतक भयानक असत की सगळ्या घराला त्याचा उच्छाद होतो.सगळ्या लोकांना थोडया वेळाने त्याचा वैताग यायला लागतो.की सारख सारख आ ई गss माझे गुढ़गे.जो येईल त्याला काय सांगायच?आशे गुढ़गे दुखतात तुम्हाला सांगतो ?अरे राम राम जरा उठून इकडे जता येत नाही.बर हा माणूस वैतागुण पुढ निघून गेला दूसरा कोणी हाती सापडला.आहो आप्पा साहेब तुम्हाला काय सांगू .हे गुढ़गेघ्यायच जे दूखण आहे.अरे किती वेळेला? मनुष्य मनानी इथे इतका अडकून पडलेला आसतो.म्हणुन त्या मुळे दुःख त्याला जास्त वाटायला लागत उगाचच.म्हणुन समर्थानी सांगितल.शरीरा ला दुःख होणार आहे प्रपंच्यात सुध्दा संकट येणार एखादा आर्थिक फटका सोसावा लागणार.पण हे सगळ मनावर फार नाही घ्यायच. नाही तर तो आर्थिक फटका सोसत राहील हेच शंभर लोकांना सांगत बसन तर असच होत राहील काय हो मला त्रास आहे तुम्हाला कल्पना नाही.काय हो मला त्रास आहे.सारख ते मनानी बड बड करु नकोस *मानसिक दुःख आणु नकोस* शरीराला वेदना येन देह धर्म आहे.किंवा खऱ्या अर्थानि म्हटल यर तो युगधर्म आहे.पण मना मध्ये असली सारखी सल नको.
बरीचशि माणस गंमतशिर आशि बघितलिय .की त्यांना म्हटल की आता तुमचे थोडेशे गुढ़गे दुखतातय. उठून चालता येत नाही.तर मग एव्हडे चांगली पुस्तक तुमच्या घरा मध्ये पुस्तका का नाही वचत? काय सांगाव ? पुस्तक वाचत नाही गुढ़गे दुखतात.या उत्तराला काही अर्थ आहे का? गुढ़गे दुखतातय म्हणुन चालता येत नाही हे माण्य करु करु शकतो.पण गुढ़गे दुखतात म्हणुन मी वचित नाही गुढ़गे दुखतात म्हणुन नामस्मरण करत नाहीं गुढ़गे दुखतात म्हणुन मी देवाच भजन करत नाही.या सगळ्या प्रश्नोत्तराला
ला काय अर्थ आहे सांगा बर? म्हणुन समर्थानी फार सुंदर उपदेश केला.
*मना मानसी दुःख आणु नको रे*
*मना सदा सर्वदा शोक चिंता नकोरे*
समजा मी एस टी स्टॅंड वर गेलो.कुठल्या प्रवासाला मला जायचय.आपल्या पेक्षा आपले पाकिटमार हुशार आसतात.हे आनेक वेळेला ते सिध्द करत असताच. त्यातल्या एखद्या पाकिट मारान माझ पाकिट मारल.आता मी एस टी स्टॅंड वर रडत बसूका? *शोक चिंता* आहो मला गावला जायच होत माझ पाकिच गेल बघा.आहो हे मला करायच होत त्याच्यात कागद पत्र होती.हे रडून काय होणार आहे बर? मला सांगा.या पेक्षा पटकन स्वस्थ पणे आपल्या ओळखी च्या माणसाला फोन करुन त्याच्याशी संपर्क करुन की बाबा आस झालय.किंवा कुणी कंडक्टर महत्वाचा ओळखी चा असेल त्या कंट्रोलर जाऊन ळकाही सांगून याच्यातून पटकन मार्ग काढन. *माणस मार्ग कढण्याच्या मागे जातच नाही.आपली चिंता आपल दुःख उगाळण्यातच त्याला मोठे पणा आसतो* आणि समर्थ याच्या पुढचा महत्वाचा उपदेश सांगतात.
समजा आपल्याला थोडस दुःख सहन कराव लागलच तर ते पुष्कळशा वेळेला नव्वद टक्के शरीर पातळी वरच असत.खर म्हणजे या दुःखातन दूर होण्याचा सोप उपाय म्हणजे
*विवेके देहेबुध्दि सोडुनि द्यावी*
मी म्हणजे देह आहे.ही बुध्दि ज्या क्षणाला बाजूला होईल एखाद्या महद कार्या साठी एखद्या मद्त कार्या साठी एखद्या साधने साठी या देहाला किती ही कष्ट पडले तरी सुध्दा ते आनंदाचे आहे.आस जेव्हा आपल्या मना मध्ये येत राहील तेव्हा आपोआपच या कष्टा ची आपल्याला काहीही त्रासाची जाणीव होणार नाही.
*विदेही पणे मुक्ति भोगीत जावी*
विवेकी पण काही वेळेला आपल्याला येत बरका.जर एकमेकांन वर निस्सीम प्रेम असेल तर ते कव्यक्त होत.
आम्ही एकदा आजी आजोबाचा संवाद असा ऐकला होता.ते आजोबा आता कामातन रीटायर झाले होते. पण छोटी मोठी काम घेऊन एकडच्या तिकडच्या वस्त्यांन मध्ये गावांन मध्ये ते फिरत असत.आता ते एनवेळेला घरी आले पटकन.आणि ते जेवायच्या वेळेला येतील याची कल्पना नाही .त्या मुळे त्यांनच्या साठी वेगळा भात तयार झालेला नव्हता. आजिंन पुरता होता तेव्हडाच् भात उरला होता.अजोबानी तो भात बघितला मात्र आणि त्यांच्या लक्षात आल.की मी जर भात खाल्ला तर आपल्या बायकोला भात अतिशय आवडतो आणि तिला त्या जेवनात भात मिळणार नाही,हे काही बरोबर नाही. त्या क्षेणाला त्या प्रेमा पोटी...आता पोट मध्ये आपल्या भूक लागलेली आहे देह सांगते तू खाय .पण मन? ..अरे *मी म्हणजे काही शरीर नाहिये.मन म्हणजे एक वेगळी व्यक्ति माझ मन माझ आत्मस्वरूप व्यक्त करणारी आशी एक व्यक्ति आहे* तेव्हा मला सदा सर्वदा कुठ शोक चिंता आहे? आज न उद्या याच्या पेक्षा चांगल जेवन मीळनार च आहेना.मग एव्हडा हटट कशा साठी? लगेच आमचे आजोबा सांगायला सुरुवात करायचे.हे बघा मी प्रवासा मध्ये आमची एस टी थांबली होती तिथे मी खाऊन घेतल आहे.त्या मुळे मला आता फारशि भूक नाहिये.तो भात वगैरे आहे ना तो संपवून टाक.की लगेच आज्जिन रागावुन सांगायच.ही काय पध्दत झाली? बाहेर कितीही खाल्ल असल तरी घरी तो दूध भात तुम्हीच खाल्लाच पाहीजे तरच पोटाला शांत वाटेल.आ ग मला नकोय भात तुला किती वेळेला सांगितल माझ खरच खान झालआहे.ते चालणार नाही.हा भात अर्धा अर्धा खायला लागला तरी चालेल.तुम्ही अर्धा खा मी अर्धा खा.आणि काही वेळेला आपल्याला आस वाटत की काय ही दोघ भांडतातय? तेव्हा जानती माणस सांगतात.व्वा .ते भांडत नाहिये त्यानच खरच एकमेकावर प्रेम आहे,ते प्रत्येक वेळेला हा विचार करतातय.की *मला कमी पडल तरी चालेल मी ज्याच्यावर प्रेम करतो त्याला कमी पडल नाही पाहीजे* त्या क्षणा पुर्तका होईना त्या प्रेमा पुर्त का होईना ते विदेही होतात.स्वःहा देहातून त्यांच मन बाहेर येत.त्यांची वृत्ति बाहेर येते.म्हणजे दुसऱ्याच्या देहाचि काळजी करायला लगतात ,तेव्हा ते उपाशी आहे हया आपोआप च दुःखातून निवृति झाली का नाही? मला सांगा? *माणसानि नेहमीच आपल्या यातनेच्या वेळेला हा विचार करावा.की आज ना उद्या सुखाचे दिवस येणार च आहेना.या यातनेचा उगीच बाऊ करत बसण्या पेक्षा या काळात आस कराव की अनेकान् च हित आपल्या कडून साधल्या जाव.या तऱ्हेची आपली मनोवृत्ति तयार व्हावी. म्हणुन समर्थानी या श्लोका मध्ये आपल्याला सुंदर उपदेश केलाय.आपण तो प्रत्येक क्षणी तो आपण लक्षात ठेऊ या*
|| जय जयरघुवीर समर्थ ||