जीवा कर्मयोगे जन्म झाला |
परी शेवटी काळमूखी निमाला |
महा थोर ते मृत्युपंथेचि गेले |
कितीएक ते जन्मले आणि मेले ||14||
जय जय रघुवीर समर्थ.
समर्थ म्हणतात आपला जन्म जो आता झालाआहे कशाने झाला मला सांगा?
*जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला*
की मागील जन्मा मध्ये जे काही आपण कर्म केल त्यातल काहिस प्रारब्द भोगाणे त्या जन्मा मध्ये भोगुन संपल.आणि आता जे भोगायच उरलय जे संचित राहील त्या साठी म्हणुन आपला परत जन्म झाला आहे.तर ठीक आहे.जे संचित राहिलय ते भोगत असताना पुढच्या सगळ्या आयुष्या साठी.योग्य क्रियमाण आहे.ते करायला नको का? जन्म हा दुःखमय आहे.जन्माला येन हेच दुःख आहे.जन्माला येन जन्म घेण हेच दुःखाच कारण आहे.असा जर तू विव्हळत बसलास याच पध्दतिन तू उद्या परत परामुखात निघून जशील.माणसा च्या जीवनात जे सार्थक करायच ते होणार नाही. तर मराठी वाङ्गमया मध्ये एक चांगला श्लोक आहे.
"आला आला प्राणी जन्मासी आला
झाला झाला वढला थोर झाला
केला केला थोर संताप केला
गेला गेला पापुड़ा व्यर्थ गेला."
आस आपल जीवन व्यर्थ जात असत.एक सूंदर कथा आशी आहे.की
एक अंधळा मनुष्य दुर्दैवान एका अंधाऱ्या कोठडी मध्ये सापडुन जातो.आणि त्या कोठडिच्या दाराला काही कुलुप नसत. ते दार उघडता येन्या सारख असत. आता ते दार समजन्या साठी प्रत्येक गोष्ट थोडिशि हलवुन बघावि लागणार आसते.त्या प्रमाणे तो सगळ्या भिंती चाचपत चाचपत जातो.मधला एखादा दगड ढीला सापडला तर तो थोडा हलवुन बघतो.आणि त्याच्या लक्षात येत नाही दार नव्हे दगड आहे .आणि आस जेव्हा तो बिचारा फिरत फिरत त्या दारा पाशी येतो का कुणास ठाऊक त्याच्या डोक्याला खाज सुटते.किंवा पाढीला खाज सुटते परीणामतहा तो समोरचि भिंत चाचरण्या पेक्षा डोक खाजवतो. थोडस पाढ खाजवनार चार पावल पुढ जातो.या एका चुकी च्या कर्मा मुळे गरबड आशी झाली की जे दार हाती लागत होत ते हातातून गेल.आणि आता
"पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम.
पुनरपि जननी जठरे शयनम"
या एका क्षणाच्या काही गोष्टीन मध्ये या आंधाऱ्या कोठडी मधुन मुक्त होता येत होत.का वेडया त्याच वेळेला झोप काढतोस? तेव्हा ह्य सगळ्या *जन्म मृत्यु च्या चक्रातुन मुक्त होण हे फक्त या मानव देहातच सधता येत* या मानवदेहा मध्ये नुसताच आपल्या व्यवसायाच्या निमित्यान विद्येच्या निमित्यान मोठा होत गेलस आणि मग नंतर मी किती मोठा आहे? मी किती मोठा आहे? मी हे कस मिळवल मी ते कस मिळवल आणि मग मी हे तुम्हाला स्पर्श करण्याच अधिकार नाही.लोकांनवर नुसता संताप करत बसलास काय होईल सांगा?
आपल्या कडे इतिहासात फार प्रसिध्द कथा आहे.
जो ग्रीक सम्राट अलेकझण्डर जो भारतावर चाल करुन आला होता.सगळ जग जिंकेन आशी त्याची प्रतिज्ञा होती अनेक ठिकाणी अज्ञानाना मुळे लोक त्याला जगतजेता म्हनतातय.पण तो जगतजेता नव्हताच.कारण त्यानि भारत जिंकला नाही.आणि भारता शिवाय काही जग असत नाही.भारताचा उंबरठा किंवा आंगन सुध्दा त्याला फारस जिंकता आल नाही.तरीसुध्दा या जगतले आणखिन काही देश त्याने पादाक्रांत केले.प्रचंड संपति मिळवली आमुक मिळवल तमुक मिळवल आणि जेव्हा भरता मध्ये पराभव पाहून जेव्हा तो त्याच्या नगरी गेल तेव्हा या पराभवाचा थोडासा विसर पडावा आणि अंतकाली का होईना बहुतेक त्याला कळल असेल की नुसत्या शस्त्रांनी भिंती दाखवून किंवा आपल्या विद्वत्तेन वाढवलेल साम्राज्य हे आपल्याला सुख तृप्ति समाधान देत नाही .तेव्हा मृत्यु च्या समयी तो विव्हळ झाला आस म्हणतात खर.आणि त्यानि आपल्या सेनापतिला सांगितल की मला सगळी कडे फिरवा मला बघायच मी काय कमावल ते आणि शेवटी जाताना उघड्या हातानि गेला.आणि याच कारण आस संगतात की शेवटी तो जगतजेता ज्याला आपण अज्ञानाणी जगतजेता म्हणतो त्या एका भरतात पराभुत झालेल्या सम्राटानी सुध्दा सगळ्या विषयाला तेच सांगितल की शस्त्राच्या बळावर कित्येक गोष्टी मिळवता येतील पण रिकाम्या हातानिच जायचय. जायचय तेव्हा नेता येन्या सारखी गोष्ट फक्त एकच आहे.ति म्हणजे परमेश्वराची केलेली साधना.परमेश्वराची केलेली भक्ति.आणि मग *जी गोष्ट आपल्याला जन्मो जन्मी पुढ घेऊनज जाणारआहे.काही प्रगति देणार आहे. काही सौख्य प्रदाण करणार आहे ति गोष्ट मिळवण्या कडे तू जात नाहिस् आणि जी गोष्ट या ठिकाणी सोडुन जावी लागणार आहे त्यागोष्टी साठी जीवना मध्ये तुझा आटा पिटा चाललाय.कारे वेडया आपल जीवन व्यर्थ का घालवतो?* हे आपल्याला अतिशय कळवळयाणी पटवून सांगण्या साठी हा श्लोक दिला आहे.
|| जय जयरघुवीर समर्थ ||