करावी कृपा गुरुनाथा (श्री दत्त भजन)

भवतारक या तुझ्या पादुका वंदिन मी माथां ।
करावी कृपा गुरुनाथा॥धृ .॥

बहु अनिवार हे मन माझे चरणी स्थिर व्हावें । 
तव भजनी लागावें ॥ 
कामक्रोधादिक हे षड्रिपु समूळ छेदावे । 
हेचि मागणे मला द्यावें । ( चाल ) 
अघहरणा करिं करुणा दत्ता धांव पाव आतां ।
 करावी कृपा गुरुनाथा ॥१ ॥ 

तूंचि ब्रह्मा तूंचि विष्णु तूंचि उमाकांत । 
तूंचि समग्र दैवत । 
माता पिता इष्ट बंधू तूंचि गणगोत । 
तूंचि माझें सकळ तीर्थ ॥ ( चाल ) 
तुजविण मी गा कांहीच नेणें तूंचि कर्ता हर्ता । 
करावी कृपा गुरुनाथा ॥२ ॥ 

तनमनधन हे सर्व अर्पनी कुरवंडीन काया । 
उपे नको गुरुराया । 
कर्महीन मी , मतीहीन मी , 
सकल श्रम वाया । 
लज्जा राखी गुरु सदया ॥ ( चाल ) 
मातृबालकापरि सांभाळी तूंचि मुक्तिदाता । 
करावी कृपा गुरुनाथा ॥३ ॥ 

शेषा ब्रह्मया वेदांन कळे महिमा तव थोर । 
तेथे मी काय पामर ।। 
वियोग नसुंदे तव चरणांचा हाचि देई वर शिरीं ।
 या ठेवी अभयकर ॥ ( चाल ) 
हीच विनंती दर्शन द्यावें दासा रघुनाथा । 
करावी कृपा गुरुनाथा ॥४ ॥
थोडे नवीन जरा जुने