जटाधारी पांडुरंगा । शूलधारी कृपानिधे ।
सर्व रोग हरी देवा । अत्रिसूता तुला नमो ॥१ ॥
विश्वनिर्माण कर्ता तूं । स्थितिसंहार कारक ।
भवपाश विमुक्ताला । अत्रिसूता तुला नमो ॥२ ॥
जराजन्म विनाशी तूं । देहशुद्धि करा तुला ।
दिगंबरा दयामूर्ते । अत्रिसूता तुला नमो ॥३ ॥
कर्पूरसम देहाच्या । ब्रह्ममूर्ति धरी तुला ।
वेद शास्त्र परिज्ञात्या । अत्रिसूता तुला नमो ॥४ ॥
लघु थोर कृशा स्थूला । नामगोत्र विहीन तूं ।
पंचभूतैक दीप्ताला । अत्रिसूता तुला नमो ॥५ ॥
यज्ञभोक्त्या यज्ञरूपा । यज्ञरूप धरा तुला ।
यज्ञप्रिया सिद्ध पुरुषा । दत्तात्रेया तुला नमो ॥६ ।।
आधी ब्रह्मा मधे विष्णु । अंती देव सदाशिव ।
त्रैमूर्ति स्वरूपाला । अत्रिसूता तुला नमो ॥७ ॥
भोगरूपी भोकभोक्त्या । सुयोग्या योगधारका ।
जितेंद्रिया जितज्ञाला । दत्तात्रेया तुला नमो ॥८ ॥
दिगंबरा दिव्यरूपा । अवधूता निरंजना ।
सदोदित ब्रह्मरूपा । दत्तात्रेया तुला नमो॥९॥
जंबुद्धिपी महाक्षेत्री । मातापूर निवासि तूं ।
जपमाना महादेवा । दत्तात्रेया नमो नमो ॥१० ॥
भिक्षाटन घी ग्रामी । सोनपात्रीं करीशि तूं ।
नानास्वादयुता भिक्षा । दत्तात्रेया तुला नमो ॥१२ ॥
ब्रह्मज्ञानी तुझी मुद्रा । वस्त्र आकाश भूतल ।
प्रज्ञानधन बोधा तू । दत्तात्रेया तुला नमो ॥१२ ।।
अवधूता सदानंदा । पूर्ण ब्रह्मस्वरूप तूं ।
विदेह देहरूपाला । दत्तात्रेया तुला नमो ॥१३ ।।
सत्यरूप सदाचारी । सत्यधर्मी परायणा ।
सत्याश्रेय परोक्षाला । दत्तात्रेया तुला नमो ॥१४ ॥
हार्ती शूल गदा घेशी । वनमाला सुकंधरा ।
यज्ञप्रभो ब्रह्मरूपा । अत्रिसूता तुला नमो ॥१५ ॥
क्षराक्षर स्वरूपाच्या । परात्परतरा तुला ।
दत्तमुक्तिपर स्तोत्रा । अत्रिसूता तुला नमो ॥१६ ॥
लक्ष्मीशा दत्ताविद्याढ्या । स्वात्मरूपा प्रभो तुला ।
गुणनिर्गुणरूपा है । दत्तात्रेया नमो नमो ॥१७ ॥
शत्रुनाशकर स्तोत्र । ज्ञानविज्ञान दायक ।
सर्व पापें लया जाती । स्तोत्राच्या पठणे तुझ्या ॥१८ ॥
ऐसें स्तोत्र महादिव्य । दत्तदर्शनदायक ।
श्रीदत्ताच्या प्रसादाने । नारदानें निवेदिले ॥१ ९ ॥
स्तोत्रराज महादिव्य । प्राकृती रचिले असे ।
श्रीगुरुच्या प्रसादानें । होईल फलदायक ॥२० ॥