नमस्कार मित्रांनो,
आजचा आपला विषय आहे योगा करण्याचे फायदे काय?
योगाचे फायदे सांगायचं झाले तर ते अनेक आहेत. जसे की,
१. योगाद्वारे मनाची एकाग्रता साधता येते. २. परिपूर्ण आध्यात्मिक दृष्टी व शांतता प्राप्त करुन घेण्यासाठी मदत होते.
३. योगाभ्यासाने आपले शरिर सुद्दृढ आणि चपळ होते.
४. नियमितपणे योग केल्याने आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
५. योग केल्याने आपल्याला मनःशांतता लाभते ज्यामुळे आपण आपल्या कामामध्ये जास्त एकाग्र होऊ शकतो. इत्यादी
तसेच शांतता, चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी परिपूर्ण शिस्त म्हणून योगाकडे बर्याच वर्षांपासून पाहीले जाते. पुर्वी ऋषी मुनी हिमालयात जाऊन साधना (योग) करत. तुम्ही तर ऐकलेच असेल की
आपले पूर्वज म्हणजेच जुन्या पिढीचे लोक हे खूप आयुष्य जगात होते, त्यांना जास्तीत जास्त वयाच्या ६० वर्षाच्या पुढे चष्मा लागत तसेच आपण पहिले तर त्यांचे केस तरुणपणी काळे-खाप असायचे. आणि आताची नवीन पिढी बद्दल सांगायचे तर आजकाल मुलांना वयाच्या ५ व्या चष्मा लागतो आणि तारुण्ण्यात येण्यापूर्वीच त्यांना हेअर डाय लावावा लागतो. कारण पूर्वीचे लोक योग करत असत परंतु आता आपल्याला ह्या गोष्टीची सवय राहिली नाही त्यामुळेच तर या अशा विपरीत गोष्टी आपल्याला दिसतात. या आधुनिक युगात योगाच्या फायद्यांबद्दल बरेच काही आपल्याला ऐकायला, वाचायला मिळते तसेच बरेच योगगुरू जसे कि (स्वामी रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर्जी आदि.) आपल्याला योगाबद्दल जागृत करतात. आपले मन, शरीर आणि आत्मा एकाग्र करण्यास योग मदत करतो. योग सराव साधारणतः तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे - योगासन, प्राणायाम आणि ध्यान. . आज पश्चिमेतील योगाची सर्वात लोकप्रिय शैली हठ योग आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे हठ योगाची शास्त्रीय शैली असलेले आनंद योग शरीरात सूक्ष्म उर्जा जागृत करण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी आसन आणि प्राणायामचा वापर करते आणि सात चक्रांच्या उर्जेवर लक्ष केंद्रित करते. हे हठ योग आणि जैवरासायनिक पद्धतीच्या तत्त्वांवर आधारित आहे. अष्टांग योग हा परिपूर्ण योग असू शकतो.
अष्टांग योग पुढील प्रमाणे-
1यम
2नियम
3आसन
4प्राणायाम
5प्रत्याहार
6धारणा
7ध्यान
8समाधी
त्यामुळे याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपक्रम बनवा व शरीराला तंदुरुस्त व दीर्घायुषी बनवा.