कालसर्प योग म्हणजे काय ?

कालसर्प योग काय आहे ?

             या जगात जेव्हा कुठलाही प्राणी ज्यावेळी जन्म घेतो ती वेळ त्या प्राण्याच्या सर्व जीवनासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. करण त्या एका


  क्षणाच्या आधारे ज्योतिष शास्त्राच्या मदतीने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा एक असा आलेख तयार केल्या जाऊ शकतो, ज्यामध्ये त्याच्या जीवनातील वेळो वेळा घडणार्या शुभ आणि अशुभ घटनांच्या विषयी वेळेच्या आधीच जनता येऊ शकते.

             जन्माच्या वेळेनुसार तयार करण्यात आलेल्या जन्मकुंडलीत बारा     भाव  असतात जन्मकुंडलीचे हे स्थान नवग्रहाची स्थिती आणि योग  जातकाच्या भविष्याबद्दल संपूर्ण माहिती प्रगत करते. जन्मकुंडलीच्या विभिन्न स्थानात  या नवग्रहाच्या  स्थिती योगाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या  शुभ अशुभ योग तयार होतात. हे योग त्या व्यक्तीच्या जीवनावर आपला शुभ अशुभ प्रभाव पाडतात.

            ग्रह जेव्हा जन्मकुंडलीच्या एका स्थानावर एकत्रित होतात तेव्हा  जी परिस्थिती निर्माण होते त्याला योग असे संबोधले जाते. 

            जन्मकुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या एकाच बाजूला येतात अशा वेळी त्या कुंडलीत कालसर्प योग तयार होत         असतो.

        कालसर्प योग हा एक त्रासदायक योग आहे प्रापंचिक  ज्योतिषशास्त्रात या योगाचे विपरीत परिणाम दिसतात प्राचीन भारतीय ज्योतिष शास्त्रात कालसर्प योग या विषयावर मौन धारण केले आहे आधुनिक ज्योतीश्शास्त्राज्ञानी  जातकाच्या जीवनावर याचा काय परिणाम होतो याविषयावर   प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे . महर्षी पराशर महर्षी वराहमिहिर यांसारख्या विद्वान प्राचीन ज्योतीशाचार्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथात कालसर्प योगाबद्दल विवेचन केले आहे. 


  धन्यवाद  

थोडे नवीन जरा जुने