मिठा पिठाचा जोगवा

मिठा पिठाचा जोगवा याहो बायांनो दरबारी


मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला कुंकू घेईन ग


आई आंबेला लावीन ग परत माघारी येईन ||१||



मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला बांगड्या घेईन ग


आई आंबेला घालीन ग परत माघारी येईन ||२||



मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला हारवेणीघेईन ग


आई आंबेला घालीन ग परत माघारी येईन ||३||



मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला साडीचोळी घेईन ग


आई आंबेला नेसवीन ग परत माघारी येईन ||४||



मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||



तुळजापूरला जाईन आईला नैवेद्य करिन ग


आई आंबेला दाखवीन ग परत माघारी येईन ||५||



मला बाय जायाचं गुरुवारी ग तुळजापूरच्या बाजारी ||धृ||


------------ दुसऱ्या स्वरूपात-------------


मिठा पिठाचा जोगवा । जोगवा ग जोगवा ।। 


याग बयांनो दरबारी ग मला जायचे दूरवरी ।



तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन । 


हळद कुंकू घेईन ग अंबिकेला वाहिन । 


अंबिकेला वाहिन ग मग मी परत येईन ।।१।।



तुळजा पुरला जाईन हिरवी साडी घेईन । 


हिरवी साडी घेईन ग अंबिकेला नेसविन। 


अंबिकेला नेसविन ग मग मी परत येईन ।।२।।



तुळजा पूरला जाईन हिरवा चूडा घेईन । 


हिरवा चूडा घेईन ग अंबिकेला घालिन। 


अंबिकेला घालिन ग मग मी परत येईन ।।३।।



तुळजा पुरला जाईन हार गजरे घेईन । 


हार गजरे घेईन ग अंबिकेला घालिन। 


अंबिकेला घालिन ग मग मी परत येईन ।।४।।



तुळजा पुरला जाईन खण ओटी घेईन । 


खण ओटी घेईन ग अंबिकेला वाहिन । 


अंबिकेला वाहिन ग मग मी परत येईन ।।५।।



तुळजा पुरला जाईन पुरण पोळी करीन। 


पुरण पोळी करीन ग नैवेद्याला अर्पिन । 


नैवेद्याला अर्पिन ग मग मी परत येईन ।।६।।



तुळजा पुरला जाईन तांबुल विडा घेईन । 


तांबुल विडा घेईन ग अंगिकेला देईन । 


अंबिकेला देईन ग मग मी परत येईन ।।७।।



तुळजा पुरला जाईन आईचा जोगवा मागेन ।


आईचा जोगवा मागेन ग अंबिकेला अर्पिन

 

अंबिकेला अर्पिन ग मग मी परत येईन ।।८।।



तुळजा पुरला जाईन उदो उदो गर्जिन । 


उदो उदो गर्जिन ग अंबिकेला नमिन् । 


अंबिकेला नमिन् ग मग मी परत येईन ।।९।।

थोडे नवीन जरा जुने