पाहुनी आली घरा जगदंबा माझी

पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा

आहो आली आली पाहुनी आली घरा

जगदंबा माझी पाहुनी आली घरा 

सढा सारवन केले दारात 

हळदी कुंकाने देवी चा मळवत भरून 

मोत्यांन भांग भरा .. अंबाबाईचा मोत्यांन भांग भरा 

जगदंबा माझी...

पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा

अश्विन महिना प्रतिपदेला 

देवी बैसली माझी घटस्थापनेला

दैत्याचा वध केला अंबाबाईन दैत्याचा वध केला

जगदंबा माझी....

पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा

जिजामाई ने सेवा केली

तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेहली

पोटी मागितला हिरा अंबाबाई ला पोटी मागितला हिरा

जगदंबा माझी...

पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा

थोडे नवीन जरा जुने