दारिद्र दुःख दहन शिव स्तोत्रम्

विश्वेश्वराय नरकार्णव तारणाय

कर्णामृताय शशिशेखर धारणाय

कर्पूरकांति धवलाय जटाधराय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।1।।
 
समस्त चराचर जगाचा स्वामी श्री विश्वेश्वर,, नरक रुपी महासागरातून जगाची सुटका करणारा, कर्णाने ज्याचे नाव ऐकल्यावर अमृतसारखे वाटते, ज्याने चंद्राला भाल्यावर अलंकार म्हणून धारण केले आहे, कापूराच्या तेजासारखे ज्याचा वर्ण श्वेत आहे, ज्याने केसांच्या जटा बांधल्या आहेत, तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..
 
गौरीप्रियाय रजनीशकलाधराय

कालान्तकाय भुजगाधिपकंकणाय

गंगाधराय गजराज विमर्दनाय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।2।।

 
भगवती महागौरीचे अत्यंत प्रिय असणारे, रजनीश्वर (चंद्राची) कला धारण करणारे, कालचे ही काल असणारे , कंकानाच्या रूपात नागराज धारण करणारे, डोक्यावर गंगा धारण करणारे, गजराजाचा नाश करणारे तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..

 
भक्तिप्रियाय भवरोग भयापहाय

उग्राय दुर्गभवसागर तारणाय।

ज्योतिर्मयाय गुणनाम सुनृत्यकाय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।3।।
 

ज्यांना भक्ती अत्यंत प्रिय आहे असे, प्रापंचिक व्याधी आणि भय यांचा नाश करणारे, विनाशाच्या वेळी उग्र रूप धारण करणारे, दुर्गम भव (संसार) सागर पार करण्यास मदत करणारे, ज्योती स्वरूप, सुंदर तांडव नृत्य करणारे तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..
 
चर्माम्बराय शवभस्म विलेपनाय

भालेक्षणाय मणिकुंडल मण्डिताय

मञ्जीर पादयुगलाय जटाधराय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।4।।

 
व्याघ्रचर्म धारण करणारे, सर्वांगी चिताभस्म विलेपन करणारे, कपाळी तिसरा डोळा असनारे, सुंदर मोत्यांनी शोभणाऱ्या पायघोळ पायात घालणारे तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..
 
पञ्चाननाय फनिराजविभूषणाय

हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय

आनंदभूमिवरदाय तमोमयाय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।5।।

 
पाच मुखे असलेले, नागराजरुपी अलंकार धारण करणारे, सोन्यासारखे वस्त्र असलेले किंवा सोन्यासारखे किरण असलेले, तिन्ही लोकांमध्ये पूजनीय, आनंदभूमीला (काशी) वरदान देणारे, सृष्टीच्या नाशासाठी तमोगुणष्टी असलेले तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..
 
भानुप्रियाय भवसागर तारणाय

कालान्तकाय कमलासन पूजिताय

नेत्रत्रयाय शुभलक्षणलक्षिताय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।6।।

 
जे सूर्याला अत्यंत प्रिय आहे, जे आपल्याला संसार रुपी महासागरापासून वाचवतात, जे कालाचेही महाकाल स्वरूप आहेत, ज्याची कमलासनात वास करणारे ब्रह्मदेव पूजा करतात, ज्याला तीन डोळे आहेत तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..

 
रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय

नागप्रियाय नरकार्णवतारणाय

पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।7।।

 
मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामांना अत्यन्त प्रिय असणारे, रघुनाथांना वर देणारे, नाग सरपांचे अत्यंत प्रिय, भवसागररूपी नरकापसून रक्षण करणारे, महापुण्यकारी, समस्त देवतांनी पूजेत असलेले तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..
 
मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय

गीतप्रियाय वृषभेश्वर वाहनाय

मातंग चर्मवसनाय महेश्वराय

दारिद्र्यदु:खदहनाय नम: शिवाय।।8।।

 
मुक्त पुरुषांचे (योगी) स्वामिरूप, पुरुषार्थ चतुष्टय रूप फल देणारे, प्रमथादि गणांचे स्वामी, स्तुतिप्रिय, ज्यांचे नन्दी वाहन आहे असे, गज चर्म रुपी वस्त्र धारण करणारे, महेश्वर तसेच दारिद्र्य व दु:खांचा नाश करणाऱ्या अशा भगवान शिवाला मी नमस्कार करतो..

वसिष्ठेन कृतं स्तोत्रं सर्वरोगनिवारणं ।

सर्वसंपत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम् ।

त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात् ॥


महर्षी वशिष्ठांनी केलेले हे स्तोत्र सर्व रोगांची निवारण करणारे असून सर्व प्रकारचे संपत्ती देणारे व पुत्र पवित्र यांची वाढ करणारे असे आहे. जो व्यक्ती या स्तोत्रांचे तीन संख्येच्या वेळी पठण करतो त्याला नक्कीच स्वर्गलोकाची प्राप्ती होते...

॥ इति वसिष्ठ विरचितं दारिद्र्यदहनशिवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
थोडे नवीन जरा जुने