आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यामुळे बऱ्याच असाच अशा रोगांवर उपचार प्राप्त झाले आहेत ही विज्ञानाची खूप मोठी प्रगती आहे. परंतु हे मात्र त्या आजारावर उपचार करते ज्या आजाराची आपण औषध घेत आहोत. प्रत्येक समस्येसाठी आधुनिक वैद्यकीय निराकरण करण्याऐवजी आपण आजारी पडू शकणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली तर किती बरे आहे.
आजार झाल्यावर ती त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये याची काळजी घेतली तर बरेच आहे ना!
त्यामुळे जर तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर पुढे दिलेल्या सात गोष्टींचे अवश्य पालन करा . याव्यतिरिक्त, आजारपण टाळण्यास मदत करणारी आणि आपल्याला वजन कमी करण्यास देखील मदत करणाऱ्या पुढील बाबींचे अवश्य पालन करा.
1. नियमित व्यायाम करणे
पूर्वीच्या लोकांचा व्यायाम हा त्यांच्या कामांमध्ये होत होता जसे की पूर्वीच्या काळी वाहनांची सोय नव्हती त्यामुळे ते पायीच एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करीत असे तसेच पूर्वीच्या काळी यंत्र साधनांचा शोध लागलेला नसल्यामुळे ते हातानेच बहुतांश कार्य पूर्ण करीत असत .परंतु आता कुठलाही प्रवास करण्यासाठी वाहनाची सोय आहे तसेच विविध यंत्राच्या माध्यमातुन खुप कार्य होत आहेत त्यामुळे अशा आपल्या जीवनात शारीरिक श्रमच उरला नाही. तसेच बर्याच रोगांचे मुख्य कारण म्हणजे ही शारीरीक निष्क्रियताच होय. आपल्या सामान्य कामासाठी आपल्याला शारीरिक श्रम करण्याची आवश्यकता नसल्यास आपण चालणे ,व्यायाम करणे , अशा प्रकारच्या इतर गोष्टी आपल्या जीवनात जोडल्या पाहिजेत.
२. नियमित समयी व पुरेशी झोप घेणे.
हे कदाचित सोपे वाटेल, परंतु बरेच लोक जेव्हा झोपायची वेळ आली आहे तेव्हा त्यांचे शरीर त्यांना सांगत असले तरीही ते व्यर्थ उशीर करतात . योग आणि आयुर्वेदिक डॉक्टर असेही म्हणतात की रात्री झोपणे आणि दिवसा सक्रिय असणे चांगले आहे. तथापि, विद्यार्थ्यांसारखे लोक रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्यासाठी कॉफी घेतात. इतरांना रात्री सक्रिय राहण्याची आणि दिवसा झोपण्याच्या सवयीचा विकार होतो. आम्ही हे करू शकत असताना, हे शेवटी आरोग्यावर टोल घेते. या प्रकारचे अनैसर्गिक जीवन कर्करोग आणि इतर आजारांना कारणीभूत ठरणारे घटक असल्याचे वैकल्पिक आरोग्य डॉक्टरांचे म्हणणे आहे.
त्यामुळे जास्त उशीर न करता आपला रोजचा लवकर झोपन्याचा उपक्रम करा
3. भूक लागल्यावरच जेवन करणे
ही देखील एक सोपी कल्पना आहे, परंतु पुन्हा एकदा आपण शरीराच्या संदेशांच्या विरोधात जातो. दिवसाची काही विशिष्ट वेळ जर आपण सवयीमुळे किंवा सामाजिक दबावामुळे खात असाल, जरी आपल्याला वास्तविक भूक नसली तरी आपण आपले अन्न योग्य पचवू शकत नाही. यामुळे अपचन सुरू होते आणि इतर जटिल आजारांची मुळे होण्याची शक्यता वाढते. भूक असणे ही खरोखर आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे, परंतु जर आपल्याला भूक नसेल तर आपण थोडा वेळ थांबून खावे. (वाजवी काळाची वाट पाहिल्यानंतरही आपल्याला भूक नसल्यास, काहीतरी चूक आहे म्हणून आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
4.महिन्यातुन 1-2 दिवस उपवास करणे
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सुट्टी शिवाय वर्षभर काम करण्यास सांगितले तर तो व्यक्ती करेल का? नाहा ना . मग आपन आपल्या पाचन तंत्रा बाबतीत हा विचार का बर करत नाहीत. जे आपल्यासाठी विश्रांतीशिवाय दिवसरात्र काम करतात त्याना पण थोडी विश्रांती द्यायला पाहिजे ना . एखादा नोकर तरी आपल्या मालकाशी तक्रार करु शकतो मालकाने दक्षता न घेतल्यास काम सोडु शकतो.अगदी त्याच प्रमाणे ते अवयव (पाचन तंत्र) आपल्याला सिग्नल देतात की ते न थांबता काम करू शकत नाहीत परन्तु जेव्हा आपण त्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतो आणि तरीही त्यांना कार्य करण्यास भाग पाडतो तेव्हा ते अवयव खराब होतात. म्हणूनच अधूनमधून उपवास करणे आवश्यक आहे. एखादा विशिष्ट दिवस ठरवून प्रत्येक महिन्याच्या त्या दिवशी उपवास करा. आपल्या हिंदू संस्कृतीने तर आपल्याला हे खुप आधीच शिकवलेल आहे जत्से की एकादशी, चतुर्थी, किंवा गुरूवार वगैरे हे आपण पुर्वी पासुनच करत आलो आहोत. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शरिरिला अन्न पचवण्यासाठी कमीत कमी 8-9 तास लागतात. तरच ते अन्न शरिराला लागते नाही तर ते नुसते जिभेला गोड लागते व बर्याच रोगाला कारणीभूत ठरते. आपल्या पाचक अवयवांना आराम देण्यासाठी आणि आपल्या शरीरातील कचरा दूर करण्यासाठी एक विशिष्ट दिवस ठरवून प्रत्येक महिनाला जर जमलेच तर प्रत्येक आठवड्याला उपवास करा.
5. योग्य प्रमाणात व योग्य वेळी पाणी पिणे
आता तुम्ही म्हणत असाल पाणी तर आम्ही रोज पितो पाणी पिणे हे तर जिवंत राहण्यासाठी अत्यंत मोलाचे आहे . हे जरी तुमचं खरं असलं तरी देखील पाणी पिण्याचे योग्य प्रमाण आहे बरेचसे लोक तर कामाच्या धुंदीमध्ये पाणी पिणे ही विसरून जातात. दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला योग्य प्रमाणात व योग्य वेळी पाणी पिण्याचे महत्त्व आहे. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे खुप फायदे आहेत जसे की वजन नियंत्रणात राहते ,चेहरा साफ व नितळ होतो, मेंदूला तजेलदार ठेवण्यासाठी मदत होते, पचनसंस्था सुधारते, पोटातील विषारी पदार्थ दूर होतात, मानसिक स्वास्थ्य उत्साहित होण्यास मदत होते त्यामुळे दिवसाभरात 10-12 ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे. आपण सगळे पाणी तर पितो पण ते जेवढ्याप्रमाणात शरीराला गरजेचे आहे तेवढ्या प्रमाणात पीत नाहीत. तसेच पाणी पिण्याची योग्य वेळ आहे .हेही तितकेच महत्त्वाचे आहे की जेवताना पाणी जास्त घेऊ नये, झोपण्यापुर्वी ही थोडेच पाणी प्यावे कारण आपण झोपतो त्यावेळेला आपल्या शरीराचे कार्य बंद असते त्यामुळे ते पाणी पचत नाही व रात्री वारंवार लगवीला जावे लागते. म्हणूनच योग्य प्रमाणात व योग्य वेळी पाणी प्या.
6.नियमितपणे ध्यान करणे
आपले शरीर आपल्या मनाशी जोडलेले आहे. आत्ताच्या काळातील बरेच रोग मनोवैज्ञानिक (मानसिक रोग) असतात. तणाव आणि चिंता यामुळे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. ध्यान हा एक मानसिक व्यायाम आहे ज्यामुळे आपल्याला इतर गोष्टींबरोबरच जीवनाच्या चिंतांपासून दूर ठेवण्यास मदत होते . त्यामुळे नियमित पणे ध्यान करा
7.दररोज लवकर उठणे
एक जुनी म्हण आहे ना, “लवकर अंथरुणावर जाणे, लवकर उठणे माणसाला निरोगी, श्रीमंत आणि शहाणे बनवते.” हे आपल्याला श्रीमंत करेल की नाही हे मला माहित नाही, परंतु हे निश्चितपणे आपल्याला निरोगी करेल. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे हे आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी फायदेशीर असते. तसेच सकाळची शांतता आपल्याला ध्यान, योग, साधना,व्यायाम करण्यासाठी तसेच अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असते.