गणपती बाप्पा मोरया आरती

तु सुखकर्ता तु दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया । 


संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ।।धृ।।



मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तु सिद्धी विनायक । 


तुझिया द्वारी आज मी आलो, देई चित्त मज ध्याया ।।१।।



तु सकलांचा भाग्य विधाता, तु विद्येचा स्वामी दाता । 


ज्ञानदिप उजळून आमुचा, निमवी नैराश्या ।।२।।



तु माता तु पिता जगी या, ज्ञाता तु सर्वस्व जगी या । 


पामर मी वर उणे भासतो, तुझी आरती गाया ।।३।।

थोडे नवीन जरा जुने