जय जय गौरी शिवकुमरा । आयुध अंकुश परशुधरा

जय जय गौरी शिवकुमरा । 


आयुध अंकुश परशुधरा ।।धृ।। 



शुभ मंगल प्रभू मंगलमुर्ती ।


शुभ वरदानी कवणास्फुर्ती । 


वर शिरी ठेविसी अभय करा ।।१।।


आयुध अंकुश...



पूजन भजनगण भाद्रपदाला ।


सकलारंभ शुभ कार्याला । 


सिंदुर कुंकूम भाळी भरा ।।२।। 


आयुध अंकुश...



कवी राधा सुत तव नामीरत ।


रुण झुण रुण झुण हासत नाचत । 


झडकरी पावसी विघ्नहरा ।।३।।


आयुध अंकुश...

थोडे नवीन जरा जुने