अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नित्यकर्म झाल्यावर मातीचे कुंभ(केळी आणि कळसा) स्वच्छ धुवून घ्यावेत. पत्रावळीवर गहू किंवा तांदूळ घालून त्यावर पाण्याने भरलेला मोठा कुंभ ठेवावा. त्या कुंभावर पाण्याने भरलेला लहान कुंभ ठेवावा त्यात तीळ, गंध, सुपारी,दक्षिणा घालावे. आचमन प्राणायाम करून पवित्र धारण करून देशकालाचा उच्चार करावा. पितरांच्या अक्षय्य तृप्तीच्या उद्देशाने ब्राह्मणास उदक कुंभ दान करतो असा संकल्प करावा. ब्राह्मण आणि कुंभाची पूजा करावी. पितरांच्या उद्देशाने तील तर्पण करून. एषः धर्मघटः या मंत्राने ब्राह्मणास कुंभ दान करावा. या प्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदकुंभ पूजन आणि दान करावे.
अक्षय्य तृतीया उदकुंभ दान पूजन विधी
आचमन
ॐ केशवाय नमः स्वाहा
ॐ नारायणाय नमः स्वाहा
ॐ माधवाय नमः स्वाहा
ॐ गोविंदाय नमः
ॐ विष्णवे नमः
ॐ मधुसूदनाय नमः
ॐ त्रिवीक्रमाय नमः
ॐ वामनाय नमः
ॐ श्रीधराय नमः
ॐ हृषिकेशाय नमः
ॐ पद्मनाभाय नमः
ॐ दामोदराय नमः
ॐ संकर्षणाय नमः
ॐ वासुदेवाय नमः
ॐ प्रद्युम्नाय नमः
ॐ अनिरूद्धाय नमः
ॐ पुरुषोत्तमाय नमः
ॐ अधोक्षजाय नमः
ॐ नारसिंहाय नमः
ॐ अच्युताय नमः
ॐ जनार्दनाय नमः
ॐ उपेंद्राय नमः
ॐ हरये नमः
ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः
प्राणायामः
हातात पाणी घेऊन पुढील प्रमाणे प्राणायाम करावा.
प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः
असे म्हणून प्राणायाम करावा.
नंतर दोन्हीही हातांच्या अनामिकांत पवित्र धारण करावीत.
पुन्हा एकदा आचमन आणि प्राणायाम करून नंतर उजव्या हातात दोन पळ्या पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फुले घेऊन खालीलप्रमाणे संकल्पाचा उच्चार करावा.
जेथे अमुक असे आहे तेथे आपल्या नाव गोत्राचा तसेच पंचांगातील संवत्सराचे नांव, तिथी,वार नक्षत्र, वगैरेंचा उच्चार करावा
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णू पदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे,अष्टाविंशतीतमे, कलीयुगे,कलीप्रथमचरणे, भरतवर्षे भरतखंडे,जंबुद्विपे दंडकारण्यदेशे, श्रीगोदावर्याः दक्षिणेतीरे शालिवाहनशके, बौद्धावतारे, अस्मिन् वर्तमाने शोभन नामसंवत्सरे, उत्तरायने, वसंतऋतौ, वैशाखमासे, शुक्लपक्षे, तृतीयांतिथौ, मंदवासरे, कृत्तिकानक्षत्रे, वृषभ स्थिते वर्तमाने चंद्रे, मेष स्थिते श्रीसूर्ये, मेषस्थिते श्रीदेवगुरौ,शेषेशु ग्रहेषु यथायथं राशी स्थान स्थितेषु एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ, अमुक गोत्र उत्पन्नोहं,अमुक शर्मा अहं मम आत्मन: श्रुतिस्मृति-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं......अक्षय्य पितृतृप्ती पूर्वक शिवलोक महीयमानत्व सिध्यर्थं श्री ब्राह्मणाय उदकुंभदानं करिष्ये.
असे म्हणून हातातील पाणी ताह्मणात सोडावे.
या नंतर ब्रह्म विष्णू शिवात्मक धर्मघटाय नमः या मंत्रांनी कुंभाची पूजा करावी.
कुंभावर अक्षता, तीळ,जव वहावेत.
कुंभास जानवे घालावे, गंध लावावे,अक्षता वहाव्यात, फुले तुळशी वहाव्यात.
धूप दीप समर्पण करून, आंब्याचा नैवेद्य समर्पण करावा.मनःपूर्वक नमस्कार करावा.
अपसव्याने (जानवे उलटे करून) तिळ घातलेल्या पाण्याने वडील,आजोबा,पणजोबा,आई,आजी,पणजीआईचे वडील,आईचे आजोबा, आईचे पणजोबा, आईची आई,आईची आजी,आईची पणजी,तसेच इतर पितरांच्या उद्देशाने पितृतीर्थाने( अंगठ्याकडून) तर्पण करावे.
नंतर सव्य करून ब्राह्मणास गंध लावावे,पूजा केलेल्या कुंभास स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावा
एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णू शिवात्मकः |
अस्य प्रदानातृप्यन्तु पितरोपि पितामहाः ||
गंधोदक तिलैर्मिश्र सान्न कुंभ फलान्वितम् |
पितृभ्य संप्रदास्यामी ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ||
आणी कुंभाचे दान करावे.
दानाचे मंत्र म्हणून हातात पाणी घेउन जमीनीवर सोडावे.
साहित्य
गंध, अक्षता, जानवीजोड २, फुले, तुळशी, विड्याची पाने, सुपाऱ्या, गहू किंवा तांदूळ, तीळ, पत्रावळी, नैवेद्यासाठी आंबे, केळी कळसा (कलसा केळी म्हणजे मातीचे दोन कुंभ एक मोठा कुंभ व त्यावर बसेल असा लहान कुंभ)
दर्भ,पवित्र ,दक्षिणा
घरातील साहित्य
पाट, सोवळे-उपरणे
संध्यापळी, पंचपात्र, ताह्मण तांब्या,
पंचामृत, बसण्यासाठी आसने
कुंभदान विधी
Kumbhadan PDF
PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD बटणावर क्लिक करा
👇👇👇