यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर , मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात सूर्यास्त समयी दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल . त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही . म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .
ग्रहणाचा स्पर्श :- दुपारी १६:४९
ग्रहण मध्य :- दु .१७:४३
ग्रहण मोक्ष ( सूर्यास्त ) :-संध्याकाळी १८:०८
ग्रहणाचा पर्वकाल:- १ तास १९ मिनिटे राहील .
ग्रहणाचे वेध
ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून लागणार असून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामधे भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध इत्यादी करता येईल . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ पर्यंत पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र ही कर्मे करू नयेत.
ग्रहणातील कृती
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे , पर्व काळामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे . अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .
ग्रहणाचे फळ
वृषभ , सिंह , धनु , मकर या राशींना शुभ फल
मेष , मिथुन , कन्या , कुंभ या राशींना मित्रफल
कर्क , तुला , वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे .
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .
मोक्षस्नान आणि भोजनाविषयी
या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्षवेळा दिलेल्या नाहीत . तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळा नंतर म्हणजे सायंकाळी ६:३२ नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून नंतर भोजन करावे.
ज्या गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :-
१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .
२) पायाची अढी घालून बसू नये .
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .
४) झोप घेऊ नये .
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे